किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकच्छ, (२९ सप्टेंबर) – अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करीत, गुजरात पोलिसांनी कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे ८० किलो कोकेन जप्त केले. या मादक पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८०० कोटी रुपये आहे. किनार्यावर मादक पदार्थांचे अनेक पाकिटे पडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली. समुद्रमार्गे हा साठा आणण्यात आला होता आणि तो गुजरात व देशाच्या अन्य भागांत तस्करीच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच हा डाव उधळण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
मादक पदार्थांची मोठी खेप कच्छच्या किनार्यावर पोहोचली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर पोलिसांना पाहून तस्करांनी पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तस्करांविरोधात व्यापक शोध मोहीम उघडण्यात आली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. गांधीधाम शहराजवळील खाडीच्या काठावर ८० पॅकेटमध्ये कोकेन सापडले. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलिस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी ड्रग्ज तेेथेच टाकून पळ काढला असावा.