किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– आज बोलाविली झामुमो विधिमंडळ पक्षाची बैठक,
रांची, (०२ जानेवारी) – जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सोरेन यांच्या विरोधात ईडीकडे ठोस पुरावे असल्याने, त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे.
अशा स्थितीत सत्तेची किल्ली आपल्याकडेच राहावी, याची ठोस योजना हेमंत सोरेन यांनी तयार केली आहे. आपल्या खुर्चीवर पत्नी कल्पना सोरेन यांना बसविण्याची त्यांची योजना आहे. कल्पना सोरेन आमदार नसल्याने त्यांचा विधानसभा निवडणूक लढण्याचा मार्गही सोरेन यांनी प्रशस्त केला आहे. सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाचे गिरिडिह येथील आमदार डॉ. सर्फराज अहमद यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, एकप्रकारे कल्पना सोरेन यांच्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ रिकामा केला असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी झामुमो विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सोरेन त्यांची योजना सादर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ईडीकडून अटक होण्याच्या आधीच झारखंडची सत्ता कल्पना सोरेन यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. पक्षाच्या सर्वच आमदारांनी यास पाठिंबाही दिला असल्याचे समजते. हेमंत सोरेन यांना अटक होणार, हे निश्चित आहे, असे सूत्रांचेही मत आहे. अगदी कोणत्याही क्षणी त्यांना अटक केली जाऊ शकते. अशा स्थितीत सत्तेची सूत्रे आपल्याजवळच ठेवण्यासाठी हेमंत सोरेन सर्वच शक्यता पडताळून पाहात आहेत.
बिहारमध्ये झाला होता असा प्रयोग
याआधी १९९७ मध्ये बिहारमध्ये असाच प्रयोग करण्यात आला होता. कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात सीबीआयकडून आपल्याला अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रातोरात पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री बनविले होते. असे करून त्यांनी बिहारच्या सत्तेची सूत्रे स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळविले होते.