किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 26.9° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.9° से.
24.55°से. - 27.39°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलपंचायत निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाची घोषणा,
लखनौ, २ मे – उत्तरप्रदेशातील पंचायत निवडणुकांमध्ये ३.१९ लाखांवर उमेदवार अविरोध निवडून आले असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज रविवारी केली.
एकूण ३,१९,३१७ उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत. यात जिल्हा पंचायतांचे सात, क्षेत्र पंचायतांचे २,००५ आणि पंचायतींमधील ३.१७ लाख उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय, ग्राम पंचायतींच्या प्रधान पदांवरील १७८ उमेदवारही अविरोध विजयी झाले आहेत, असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंचायत निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासूनच सुरू झाली असून, आतापर्यंत उपरोक्त निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दोन दिवसपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे यात नमूद करण्यात आले. मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्याच्या एका प्रतिनिधीला प्रवेश करण्याची परवानगी असली, तरी ४८ तासांपूर्वी त्यांना आपले कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे यात म्हटले आहे.
मतमोजणी करणारे अनेक जण बाधित आढळल्याने खळबळ
अलिगढ – कोरोना संक्रमणाच्या सावटाखाली सुरू झालेली पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अडचणीत आली आहे. अलिगढ जिल्ह्यात मतगणना सुरू असतानाच खैर ब्लॉकच्या गटविकास अधिकार्यासह अनेक जण संक्रमित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मतमोजणी दरम्यान अचानक प्रकृती खालावल्याने गटविकास अधिकार्याला रुग्णालयात पाठविण्यात आले. ते संक्रमित आढळल्याने संपर्कातील इतर कर्मचार्यांमध्ये भीती निर्माण झाली. त्यानंतर अनेक कर्मचार्यांची कोरोना चाचणी देखील सकारात्मक आली. या घटनेमुळे एका तासासाठी मतमोजणी प्रक्रिया ठप्प झाली. मतमोजणी केंद्राबाहेर झालेल्या गर्दीला संसर्गाचा धोका होऊ नये, म्हणून तैनात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
कोरोनाबाधितांच्या जागी खैर पंचायत समितीचे एडीओ अनिल दिनकर यांना तैनात करावे लागले आहे, तर अनेक कर्मचारी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.