किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.97°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– नवीन पक्ष स्थापन,
पाटणा, (२० फेब्रुवारी ) – जनता दल युनायटेड अर्थात् जदयूचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राष्ट्रीय लोक जनता दल हा नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा त्यांनी आज सोमवारी केली. बिहारचे मु‘यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत तीव‘ स्वरूपाचे मतभेद उफाळल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय लोक दल हा नवीन पक्ष स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मला या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे. हा पक्ष कर्पूरी ठाकूर यांचा वारसा पुढे चालवेल. राजदसोबत झालेला करार आम्ही नाकारणार आहोत, असे उपेंद्र कुशवाह यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. मागील दोन दिवसांपासून पाटणा येथे बैठका आणि चर्चा झाल्या आणि नेत्यांनी एकमताने याबाबत निर्णय घेतला. विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणाही कुशवाह यांनी केली.
नितीशकुमार चालत असलेला मार्ग वाईट
आज मी नवीन राजकीय कारकीर्द सुरू करीत आहे. काही वगळता जदयूतील सर्व जण चिंता व्यक्त करीत होते. निवडून आलेल्या सहकार्यांसोबत बैठक झाली आणि निर्णय घेण्यात आला. नितीशकुमार यांनी सुरुवातीला चांगले काम केले. मात्र, आता ते ज्या मार्गावर चालत आहेत, तो त्यांच्यासाठी तसेच बिहारसाठी वाईट आहे, असे कुशवाह यांनी सांगितले.
तिसर्यांदा ‘ब्रेकअप’, दोन वेळा ‘हिट विकेट’
उपेंद्र कुशवाह यांनी नितीशकुमार यांची सोबत पहिल्यांदा सोडलेली नाही. यापूर्वी २००५ आणि २०१३ मध्ये त्यांनी नितीशकुमार यांना दूर करीत स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यावेळी कुशवाह बिहारच्या राजकारणावर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे दोन वेळा त्यांना परतून पुन्हा नितीशकुमार यांचा आश्रय घ्यावा लागला.