किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.94°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी,
भोपाळ, (२० फेब्रुवारी ) – मध्यप्रदेश मंत्रिमंडळाने नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली असून, याअंतर्गत ‘आहत’ किंवा मद्यविक्रीच्या दुकानांशी संलग्न असलेले मद्यपानाचे क्षेत्र बंद केले जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याबाबतची घोषणा केली. नवीन उत्पादन शुल्क धोरणात मद्यसेवनापासून परावृत्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यात नियंत्रित मद्यधोरण हवे, अशी मागणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी केल्याच्या पृष्ठभूमीवर हे नवीन धोरण आले आहे.
उमा भारती यांनी संपूर्ण दारूबंदीच्या मागणी सुरुवातीला केली होती. त्यानंतर राज्यात नियंत्रित दारूविक्री करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. राज्यातील सर्वच आहत आणि शॉपबार बंद केले जातील. आता दुकानांमधून केवळ मद्यविक्री केली जाईल, या ठिकाणी मद्यपानास परवानगी दिली जाणार नाही, असे राज्य सरकारचे प्रवक्ते असलेल्या मिश्रा यांनी सांगितले. शैक्षणिक संस्था, मुलींची वसतिगृहे आणि धार्मिक स्थळांपासून दारू दुकानांचे अंतर ५० मीटरवरून १०० मीटर करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दारू पिऊन वाहन चालवल्यास परवाना रद्द करण्याचे कायदे अधिक कठोर केले जातील. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मद्यसेवनापासून परावृत्त करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे २०१० पासून राज्यात एकही नवीन दुकान उघडले गेले नाही, त्या उलट दुकाने बंद झाली आहेत, असे मिश्रा म्हणाले.