किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.8° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.8° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशकोहिमा, (२० फेब्रुवारी ) – नागालँड विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मून टाऊनमध्ये भाजपाची सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ मध्ये दुर्बिणीतून पाहिले तरी काँग्रेस दिसणार नाही, अशी टीका शाहा यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांवर असभ्य भाषा वापरल्याचा आरोपही केला.
जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले, राहुल गांधी जेव्हापासून काँग्रेस पक्षाचे नेते झाले, तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या नेत्याची पातळी खालावली आहे. पंतप्रधानांसाठी वापरल्या जाणार्या भाषेचा मी निषेध करतो. आता काँग्रेसच्या प्रवक्त्याने मोदींबद्दल अपशब्द वापरले आहेत. राहुल गांधी मोदींसाठी अपशब्द वापरतात. २०२४ मध्ये दुर्बिणीतूनही पाहिले तरी काँग्रेस पक्ष दिसणार नाही. संपूर्ण देशात काँग्रेसला कुठेही यश मिळत नाही, असे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करताना दिसत होते. याबाबत अमित शाह यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. रॅलीच्या सुरुवातीला शाह म्हणाले की, आज आम्ही पहिल्यांदाच या गावात आलो आहोत. आम्ही आज रात्री येथेच राहू. नागालँडमध्ये रालोआचे सरकार स्थापन झाले तर, आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू. केंद्र सरकार नागालँडसोबत आहे. नागालँडच्या समस्येवर तोडगा निघणे फार दूर नाही. मोदींनी या भागातील ७० टक्के समस्यांचे निराकरण केले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे मंत्रालय नागालँडसाठी चांगले काम करीत आहे. नागालँडचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.