किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलजम्मू, (२६ फेब्रुवारी ) – भारतीय वायुसेनेने ’नभ: स्पृशम दीपतम’ (गर्वाने आकाशाला स्पर्श करणे) हे आपले ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कारण हवाई दलाने जम्मूहून लेहला जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ३८८ लोकांना त्यांच्या विमानाने लेहला पोहोचवले आहे. या सर्व लोकांना हवाई दलाने ऑपरेशन सद्भावना अंतर्गत तेथे नेले आहे.
या ऑपरेशनसाठी भारतीय हवाई दलाने आपल्या आयएल-७६ विमानाचा वापर केला. या विमानाच्या मदतीने त्यांनी ३८८ लोकांना एअरलिफ्ट केले. त्यातील काही लोक जम्मूचे, काही काश्मीरचे होते, तर काही लोक मूळचे लडाखचे होते आणि रस्ता रोको किंवा अन्य कारणामुळे जम्मूमध्ये अडकले होते. भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सद्भावना अंतर्गत जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांसाठी ही सुविधा दिली आहे. या अंतर्गत हवाई दलाची दोन आयएल-७६ विमाने आज जम्मूतील हवाई दलाच्या स्टेशनवर उतरली आणि येथून ३८८ जणांसह लेहला रवाना झाली. यापूर्वी, हवाई दलाने एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या मदतीने १९ प्रवाशांना पदम व्हॅली ते लेह आणि ११ प्रवाशांना लेह ते पदम व्हॅली येथे नेले होते. लडाखच्या दुर्गम भागांना लेहशी जोडण्यासाठी कडक हिवाळ्यात ही सेवा चालवली जात आहे.