किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.68° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.68° से.
24.55°से. - 27.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलदोघांचा मृत्यू, एक गंभीर,
चंदिगढ, (२६ फेब्रुवारी ) – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन गुंडांची गोइंदवाल तुरुंगात हत्या करण्यात आली. या घटनेत मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग या दोन गुंडांचा जागीच मृत्यू झाला.तर केशवची प्रकृती चिंताजनक आहे. कारागृहातच तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, गुंड मनदीप सिंग तुफानची तुरुंगातील लॉकअपमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. या हाणामारीत हवालतीही जखमी झाले आहेत.
गायक सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपींना तुरुंगात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही दोन गुंड ठार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेत आरोपींनी लोखंडी रॉडचा वापर केला आहे. एसएसपी गुरमीत सिंह चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तूफान हा पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपी होता. मनदीप तुफानला पोलिसांनी गँगस्टर मनी रियासह अटक केली. तुफानला तरनतारनच्या वैरोवाल ठाणे अंतर्गत खाख गावातून पकडण्यात आले. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा शार्प शूटर होता. जग्गू भगवानपुरियाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मूसवाला खून प्रकरणात समोर आले. मूसवाला खून प्रकरणात मनमोहन सिंग आणि केशव हे गुंडही आरोपी आहेत.