किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलभुवनेश्वर, (९ मार्च) – ओडिशाच्या पारादीप किनाऱ्याजवळ एक हेर कबूतर पकडण्यात आले आहे. कबुतराच्या पायात एक मायक्रोचिप आणि कॅमेरा बसवलेला आहे. कबुतरांच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप किनार्यावर मच्छिमारांच्या बोटीतून हे कबूतर पकडण्यात आले. या कबुतराला काही दिवसांपूर्वी मच्छिमारांनी पकडून पारादीप येथील सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. जगतसिंगपूरचे एसपी राहुल पीआर यांनी सांगितले की, कबुतराची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि कबूतर कुठून आले हे कळेल. कबुतराच्या पायाला जोडलेल्या उपकरणात काय आहे, याचीही खातरजमा केली जात आहे.
कबुतर हेरगिरी करत असेल तर तो कशाची हेरगिरी करत होता, याचाही शोध पोलिस घेत आहेत. एसपी राहुल म्हणाले, आमचे पशुवैद्य पक्ष्याची तपासणी करतील. त्याच्या पायाला जोडलेले उपकरण तपासण्यासाठी आम्ही राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची मदत घेणार आहोत. एसपीने सांगितले की असे दिसते की हे उपकरण कॅमेरा आणि मायक्रोचिप आहे. एवढेच नाही तर कबुतराच्या पंखावर काहीतरी लिहिलेले आहे, ज्याची भाषा समजण्यापलीकडे असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. एसपी राहुल पीआर म्हणाले की, कबुतराच्या पंखांवर काय लिहिले आहे हे सांगणे कठीण आहे. कबुतराच्या पिसावर लिहिलेली भाषा जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. ’सारथी’ या फिशिंग ट्रॉलरचे कर्मचारी पितांबर बेहरा यांनी सांगितले की, त्याने कबुतर बोटीवर बसलेले पाहिले.