किमान तापमान : 26.01° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.01° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, (९ मार्च) – दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी आज आपचे नेते सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांना मंत्रिपदाची शपथ दिली. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. आतिशी यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. भारद्वाज यांनी दुसर्यांदा शपथ घेतली. केजरीवाल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारद्वाज मंत्री होते. आतिशी पहिल्यांदाच दिल्ली विधानसभेत निवडून आल्या आहेत, तर भारद्वाज तिसर्यांदा.
आतिशी यांच्याकडे शिक्षणासोबत ऊर्जा आणि पर्यटन खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली. सौरभ भारद्वाज आरोग्य खात्याचे मंत्री आहेत. यासोबत शहरी विकास, उद्योग आणि जलसंपदा खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उत्पादन शुल्क घोटाळ्यात सीबीआयने २६ फेब्रुवारीला अटक केली होती. अटक झाल्यानंतर सिसोदिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आधीपासून तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांनाही राजीनामा द्यावा लागला. या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात चारच मंत्री उरले होते. त्यामुळे सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांना मंत्रिमंडळात घेण्याची शिफारस केजरीवाल यांनी नायब राज्यपालांकडे केली होती. नायब राज्यपालांनी ही शिफारस राष्ट्रपती भवनात पाठवली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही शिफारस मान्य करत या दोघांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला परवानगी दिली. त्यानुसार आज या दोघांचा शपथविधी झाला.