किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमृतसर, (९ मार्च) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी एक दिवसीय अमृतसर दौर्यावर आहेत. विमानतळावर आलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा हा पहिलाच अमृतसर दौरा आहे. त्या श्री हरमिंदर साहिब जी, जालियनवाला बाग, दुग्यारणा मंदिराला भेट देतील. यासोबतच राष्ट्रपती मुर्मू श्री रामतीर्थलाही भेट देणार आहेत. वृत्तसंस्था एएनआयने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अमृतसर विमानतळावर आगमनाची छायाचित्रेही शेअर केली आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीची तयारी आधीच पूर्ण झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने रणनीती आखली आहे. वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. सध्या अमृतसरमधील वाहतूक ५ झोनमध्ये विभागली गेली आहे. डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था परमिंदर सिंग भंडाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराची सुरक्षा पाच सेक्टरमध्ये विभागण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रथम श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरबार साहिबला पोहोचतील आणि त्यानंतर इतर तीर्थक्षेत्रांना भेट देतील.