किमान तापमान : 26.01° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.01° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शपथविधीला प्रमुख उपस्थिती,
आगरतळा, (८ मार्च) – भाजपाचे नेते माणिक साहा यांनी बुधवारी अतिशय संवेदनशील समजले जाणारे सीमावर्ती राज्य त्रिपुराच्या मु‘यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी रतनलाल नाथ, प्राणजित सिंघा रॉय, संताना चकमा, बिकाश देबवर्मा आणि सुक्ला चरण नोआटिया यांच्यासह आठ मंत्र्यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी शपथ दिली. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. त्रिपुराच्या मंत्रिमंडळात भाजपाचे आठ आणि मित्रपक्ष आयपीएफटीच्या एका मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे.
नोआटिया हे इंडिजनेनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) पक्षाचे आहेत. कॅबिनेटमधील नऊ मंत्र्यांपैकी चार नवीन चेहरे आहेत तर, यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या पाच जणांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात असलेले भगवान दास, मनोज कांती देब, रामप्रसाद पॉल आणि रामपदा जमातिया यांना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे. माणिक साहा यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात तीन आदिवासी आमदारांनाही स्थान देण्यात आले आहे. सिपाहीजला जिल्ह्यातील धनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत विजयी झालेल्या केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी शपथ घेतली नाही. मंत्रिमंडळातील तीन जागा अद्याप रिक्त आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विरोधातील डावे आणि काँग्रेस पक्षाने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. आम्ही या हिंसाचाराचा निषेध म्हणून माणिक साहा यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बिराजित सिन्हा यांनी सांगितले. टिपरा मोथामधील १३ पैकी एकही आमदार शपथविधी सोहळ्यात दिसला नाही. पण, पक्षाचे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, टिप्राने तडजोड केलेली नाही, थांबा आणि पाहा.घटनात्मक तोडगा काढण्यासाठी भारत सरकारला भेटण्याबाबत आम्हाला सांगितले जाईल, याची खात्री आहे. यावेळी आम्ही आमच्या नेत्यांच्या वैयक्तिक फायद्याबद्दल नव्हे तर, केवळ १४ लाख टिपरांच्या हक्कांबद्दल बोलू, असे देबबर्मा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला आहे तर, आयपीएफटीच्या एका उमेदवाराला विजय मिळाला.