किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलआयटी शाखेच्या १३ पदाधिकार्यांनी सोडला पक्ष,
चेन्नई, (८ मार्च) – तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आहे. चेन्नई पश्चिममध्ये भाजपाच्या आयटी अर्थात माहिती व तंत्रज्ञान शाखेच्या १३ पदाधिकार्यांनी पक्ष सोडला आहे. ‘मी भाजपासाठी वर्षानुवर्षे काम केले आहे. लोकांना माहीत आहे की मी कधीही कोणत्याही पदासाठी आकांक्षा बाळगली नाही. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील असामान्य परिस्थिती पाहता मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे भाजपाच्या आयटी शाखेचे जिल्हाध्यक्ष अनबरासन यांनी सांगितले. या निवेदनावर आयटी शाखेच्या १० जिल्हा सचिव आणि २ आयटी शाखेच्या जिल्हा उपसचिवांच्या स्वाक्षर्या आहेत.
दुसरीकडे, रविवारी भाजपा तामिळनाडू युनिटच्या आयटी सेलचे प्रमुख सीटीआर निर्मल कुमार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना लक्ष्य करीत राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर काही तासांनी त्यांनी एआयएडीएमकेचे अंतरिम प्रमुख के. के. पलानीस्वामी यांची भेट घेतली आणि त्यांच्या पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, तामिळनाडूच्या राजकारणात भाजपा आणि एआयएडीएमके यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे. भाजपाचे काही पदाधिकारी एआयएडीएमकेमध्ये सामील होणे, हेच दर्शविते की भाजपा तामिळनाडूमध्ये आगेकूच करीत आहे, असे तामिळनाडू भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी म्हटले आहे. मात्र, २०२१ मध्ये भाजपा आमदाराचा विजय एआयएडीएमकेमुळेच झाला होता, कारण आधी त्यांना ‘नोटा’ पेक्षाही कमी मते मिळाली होती, असा पलटवार एआयएडीएमकेने केला.
तामिळनाडू भाजपाच्या आयटी शाखेचे प्रमुख निर्मल कुमार यांनी अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि अण्णामलाई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मंगळवारी, भाजपाच्या बौद्धिक शाखेचे माजी राज्य सचिव कृष्णन, आयटी शाखेचे राज्य सचिव दिलीप कन्नन, त्रिची ग‘ामीण जिल्हा उपाध्यक्ष विजय आणि राज्य ओबीसी विंगचे सचिव अम्मू यांनी माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके प्रमुख एडप्पाडी के पलानीस्वामी यांची भेट घेतली. निर्मल कुमार यांच्याप्रमाणेच आयटी शाखेचे माजी राज्य सचिव कृष्णन यांनीही अण्णामलाई यांच्यावर गंभीर आरोप करीत भाजपाचा राजीनामा दिला. याबाबत सोशल मीडियावर अण्णाद्रमुक आणि भाजपा समर्थकांमध्ये वाद सुरू झाला आहे.