किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलअहमदाबाद, (८ मार्च) – भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी गुजरातच्या समुद्राजवळ एक इराणहून आलेली बोट पकडली. या बोटीवरील जवळपास ६१ किलो मादकपदार्थ जप्त करण्यात आले. मादकपदार्थांचे मूल्य जवळपास ४२५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथक अर्थात् एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरातजवळ खोल समुद्रात ही कारवाई करण्यात आली.
गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने एकत्र मोहीम राबवत सागरीमार्गे भारतात येणारे कोट्यवधी रुपयांचे मादकपदार्थ जप्त केले. पोलिसांना समुद्रामार्गे भारतात मादकपदार्थ येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, एटीएस आणि तटरक्षक दल यांनी एकत्र येत कारवाई केली. या कारवाईसाठी दोन तटरक्षक बोटींचा वापर करण्यात आला होता. पोलिसांची ही गोपनीय कारवाई सुरू झाली त्यावेळी मादकपदार्थ घेऊन येणारी नौका ओखापासून १८० सागरी मैल दूर होती.