किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– ६० हजार एकरपेक्षा जास्त जमीन,
भुवनेश्वर, (०२ ऑक्टोबर) – पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या नावावर ओडिशा आणि इतर सहा राज्यांमध्ये ६० हजार ८२२ एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ओडिशाचे कायदा मंत्री जगन्नाथ सारका यांनी सत्ताधारी बिजू जनता दलाचे आमदार प्रशांत बेहरा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
ओडिशातील ३० पैकी २४ जिल्ह्यांमध्ये महाप्रभू जगन्नाथ यांच्या नावावर ६०,४२६.९४३ एकर जमीन आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये भगवान जगन्नाथाची यात्रा काढली जाते. गुजरातसह इतर राज्यांतील अनेक प्रमुख शहरांमध्ये जगन्नाथाची मंदिरे आहेत. सारका म्हणाले, यापैकी जगन्नाथ मंदिर प्रशासनाला सुमारे ३८,०६१.८९२ एकर जमिनीचे अंतिम अधिकार रेकॉर्ड प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे सहा राज्यांमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या नावावर ३९५.२५२ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने राज्यातील विविध तालुक्यांमध्ये संस्थेच्या जागेवर असलेले अतिक‘मण काढण्यासाठी ९७४ खटले दाखल केले आहेत. एसजेटीए अधिकार्यांनी योग्य तपास केल्यानंतर, जगन्नाथ मंदिर कायदा १९५५ च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.