किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– खाण लीज प्रकरणी झारखंडच्या राज्यपालांचे मत,
रांची, (०२ ऑक्टोबर) – मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा समावेश असलेल्या बेकायदेशीर खाण लीज प्रकरणाचा संदर्भ देत, एखाद्याच्या कृतीचे परिणाम भोगावेच लागतात, असे वक्तव्य झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना केले. राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि नक्षलवादाच्या विरोधात कठोर कारवाईच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ज्या प्रकारे गुन्हेगारी टोळ्या तुरुंगातून कार्यरत आहेत आणि नक्षलवाद्यांकडून सुरक्षा कर्मचारी मारले जात आहेत, त्याबद्दल राधाकृष्णन् यांनी तीव‘ नाराजी व्यक्त केली.
हेमंत सोरेन यांचा समावेश असलेल्या बेकायदेशीर खाण प्रकरणाविषयी राज्यपाल राधाकृष्णन् म्हणाले, संवेदनशील मुद्यावर घाईत मत व्यक्त करता येणार नाही. पण, त्यांच्या कृतीचे परिणाम भोगण्यास त्यांनी तयार असले पाहिजे. सभापतींच्या पक्षपाती भूमिकेचे आरोप फेटाळून लावत राधाकृष्णन् यांनी स्पष्ट केले की, आपण कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात नाही. परंतु, संविधानाचे संरक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करू शकत नाही.
कायदा आणि सुव्यवस्थेचा अभ्यास केवळ आकडेवारीच्या आधारे करता येत नाही. संघटित गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी लागेल. कुणी तुरुंगातून काम करीत आहे, तर कुणी परदेशातून. मी सरकारला नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास वारंवार सांगत आहे. त्यांना हवे असेल, तर मी केेंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून सर्व माहिती घेईल, जेणेकरून झारखंडमधील नक्षलवादाचा बीमोड करता येईल. मी पदभार स्वीकारल्यापासून आम्ही तीन कर्मचारी गमावले आहेत. हे खूप वेदनादायक आणि चिंताजनक असल्याचे राधाकृष्णन् यांनी सांगितले. माओवाद्यांकडून होणार्या सुरक्षा कर्मचार्यांच्या हत्येबाबत आपण मु‘यमंत्र्यांशी बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली.