किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– पुरासारखी पिकांत शिरली राख,
भुवनेश्वर, (१० डिसेंबर) – ओडिशाच्या झारसुगडामधील ओडिशा औष्णिक विद्युत निर्मिती महामंडळाच्या प्रकल्पातील राखेचा तलाव आज सकाळी फुटला. या घटनेमुळे परिसरातील गावांमधील राखेचा अक्षरशः पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
माहितीनुसार, ओडिशामध्ये ओपीजीसीच्या (ओडिशा पॉवर जेनरेशन कॉर्पोरेशन) वतीने औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. झारसुगडा येथील प्रकल्पात मोठी राख जमा झाली असून, त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच आज सकाळी नऊ वाजता हा तलाव फुटला. त्यामुळे ही राख परिसरातील अनेक गावांत पुरासारखा पसरली. याशिवाय पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात ओपीजीसीचे जनसंपर्क अधिकारी हिमांशू बेहरा यांनी सांगितले की, कांतातिकिरा, सारदापालीसह अन्य काही गावात प्रकल्पातील राख पसरली. यापासून घरांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. परंतु, पिकांमध्ये ही राख पुरासारखी पसरली आहे. झारसुगडाच्या जिल्हाधिकारी अबोली नरवाणे यांनी सांगितले की, आज सकाळी अचानक औष्णिक प्रकल्पातील राख भरलेला तलाव फुटला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती स्थिती निर्माण झाली होती. परंतु, त्यांना सुरक्षेबाबत आश्वस्त करण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. याशिवाय कुणाच्या घराचीही हानी झाल्यास त्यांना भरपाई मिळेल. ओपीजीसीच्या वतीने तलावाच्या दुरुस्तीचे तसेच बचाव मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय घटनेचा तपास करण्यात येत आहे.