किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भाजपाने छत्तीसगडला दिला दुसरा आदिवासी मुख्यमंत्री,
रायपूर, (१० डिसेंबर) – मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह, माजी केंद्रीय मंत्री रेणुकासिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव अशी दिग्गज नावे चर्चेत असताना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विष्णुदेव साय यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतपासून सुरू झाली आहे.
२१ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्म झालेले विष्णुदेव साय छत्तीसगडमधील कुंकुरी भागातील कानसाबेलला नजीक बगियाचे आहेत. राज्यात आदिवासी सामुराई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि साय या समाजातील आहे. १९८९ मध्ये त्यांच्या बगिया गावातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९० मध्ये ते सरपंचपदी बिनविरोध निवड आले होते. तापकरा विधानसभा मतदारसंघातून येथून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते १९९० ते १९९८ पर्यंत मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले. १९९९ मध्ये ते १३ व्या लोकसभेसाठी रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. २०२० मध्ये ते छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष झाले.
आदिवासी सामुराई समाजातील अजित जोगी यांच्यानंतर कोणीही छत्तीसगडचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. यानंतर ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. विष्णुदेव साय हे रमणसिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. मोदी सरकारच्या कार्यकाळात (२०१४-२०१९) विष्णुदेव साय यांना केंद्रात मंत्री करण्यात आले होते. २००९ आणि २०१४ मध्ये ते पुन्हा रायगडमधून खासदार झाले. २७ मे २०१४ ते २०१९ या काळात केंद्रीय पोलाद खाण, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद भूषवले. २ डिसेंबर २०२२ रोजी भाजपा राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य झाले.
‘या‘ नेत्यांच्या नावांचीही चर्चा होती
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांच्या नावाचीही चर्चा होती. ते ओबीसी समाजातून येतात. याशिवाय सरोज पांडे यांचेही नाव शर्यतीत होते. सरोज पांडे या भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. त्या भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षही होत्या. २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुख्यमंत्रीपदासाठी ब्रिजमोहन अग्रवाल यांचे नावही चर्चेत होते. सातवेळा आमदार असलेले ब्रिजमोहन हे रमणसिंह सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.