किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
– केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात निर्णय,
श्रीनगर, (१० डिसेंबर) – जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० निष्प्रभ केल्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
खोऱ्यात सर्व परिस्थितीत शांतता नांदावी यासाठी आम्ही बांधील आहोत, असे काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक व्ही. के. बिर्डी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. कलम ३७० निष्प्रभ करणे आणि जम्मू-काश्मीर देशाच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने २ ऑगस्टपासून दैनंदिन सुनावणी घेतल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता. पोलिस महानिरीक्षकांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेचे तपशील सांगण्यास नकार दिला. पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत आणि काश्मीरमध्ये शांतता बिघडणार नाही, याची काळजी घेऊ, असे बिर्डी यांनी सांगितले. त्यांनी मागील दोन आठवड्यांत खोऱ्यातील १० जिल्ह्यांमध्ये सुरक्षा आढावा बैठका घेतल्या आहेत.