किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– शहरी आवास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, (११ डिसेंबर) – फुटपाथवर बसून किरकोळ व्यवसाय करणार्यांची पठाणी व्याज घेणार्या सावकारांच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली. या योजनेचे आतापर्यंत ५६ लाख ८९ हजार लाभार्थी असून, आज रात्रभरात हा आकडा ५७ लाखावर पोहोचलेला असेल, असे शहरी आवास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात पुरी म्हणाले की, पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेणार्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर योजनेच्या लाभार्थ्यांची सर्व माहिती उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड असण्याची एकमेव अट आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेत आतापर्यंत ९० टक्के कर्ज सरकारी बँकांनी दिले आहे. खाजगी बँका आणि वित्तीय कंपन्यांचे यातील योगदान अतिशय कमी आहे, असे स्पष्ट करीत पुरी म्हणाले की, या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ४४ टक्के महिला तसेच ९ टक्के अल्पसंख्यक आहे. या योजनेत १० हजार, २० हजार तसेच ५० हजार रुपये कर्ज नाममात्र दरात उपलब्ध करून दिले जाते.
महर्षी धन्वंतरी भारतीय आरोग्यविज्ञानाचा प्रतिक
महर्षी धन्वंतरी भारतीय आरोग्यविज्ञानाचे प्रतिक आहे. त्यांच्या या गौरवशाली वारशाचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी केले. लोकसभेत आज शून्य तासात तृणमूल काँग्रेसचे शंतनू सेन यांनी भारतीय चिकित्सा आयोगाने आपल्या प्रतिकचिन्हात केलेल्या बदलाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारच्या या कृतीमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला. यावर हस्तक्षेप करताना मंडाविया म्हणाले की, महर्षी धन्वंतरी भारतीय आरोग्यविज्ञानाचे प्रतिक आहे. त्यांनी या क्षेत्रात खूप संशोधन केले, प्रत्येक भारतीयाला आपण महर्षी धन्वंतरी यांच्या वारशाचा वारस असल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. भारतीय चिकित्सा आयोगाच्या प्रतिकचिन्हात फक्त महर्षी धन्वंतरी यांचे चित्र समाविष्ट करण्यात आले तसेच ते रंगीत करण्यात आले.