किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता,
नवी दिल्ली, (११ डिसेंबर) – भारतीय वायुदलाने आपले नाव बदलण्याची तयारी पूर्ण केली आहे. भविष्यात वायुदलाला ‘इंडियन एअर अॅण्ड स्पेस फोर्स’ अर्थात् भारतीय वायू आणि अंतरिक्ष दल म्हटले जाऊ शकते. लवकरच या नावाला अंतिम मंजुरी मिळू शकते. जगभरात आपली ओळख केवळ शक्तिशाली वायुदल नव्हे, तर एक विश्वसनीय एअरोस्पेस पॉवर म्हणून व्हावी, अशी वायुदलाची इच्छा आहे.
यासाठी वायुदलाने एक तत्त्वप्रणाली तयार केली आहे. ‘स्पेस व्हिजन-२०४७’ असे या तत्त्वप्रणालीला नाव दिले आहे. यानुसार वायुदल इस्रो, डीआरडीओ, इन-स्पेस आणि इतर खाजगी कंपन्यांसोबत एक करार करेल. अंतराळ तंत्रज्ञानात पुढे जाण्यासाठी एक वातावरण या माध्यमातून तयार केले जाईल. सध्या वायुदलाकडे संपूर्णपणे ऑटोमोटेड एड डिफेन्स नेटवर्क आहे. या इंडिग्रेटेड एअर कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टिम म्हटले जाते. याला इंटिग्रेटेड एअर स्पेस कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टिममध्ये बदलण्याची योजना आहे. वायुदलाने अधिकारी आणि एअरमॅन यांना अंतराळ संबंधीचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. मार्च २०१९ मध्ये डीआरडीओने मिशन शक्तीच्या माध्यमातून अंतराळातील आपला जुना उपग्रहाचा वेध घेतला होता. यासाठी अॅन्टी-सॅटेलाईट इंटरसेप्टर मिसाईलचा वापर करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राने ७४० किलो वजनाच्या मायक्रोसॅट-आर उपग्रहाचा २३८ किमी उंचीवर वेध घेतला होता.
स्पेस कमांड उभारण्याची तयारी
केंद्र सरकार लवकरच ही मागणी पूर्ण करेल, अशी वायुदलाला अपेक्षा आहे. पूर्ण क्षमता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेणारे स्पेस कमांड उभारण्याची तयारीही वायुदल करीत आहे. या अंतर्गत वायुदलाकडे स्वतःचे १०० उपग्रह अंतराळात तैनात असतील आणि या माध्यमातून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल.
१०० उपग्रहांचा असा होणार वापर
अंतराळात तैनात करण्यात आलेल्या १०० उपग्रहांच्या वापर इंटेलिजेन्स, सर्व्हेलन्स, आणि रिकॉन्सेंस म्हणजे आयएसआरसाठी केला जाणार आहे. हे सर्वच उपग्रह लष्करी वापरासाठी असतील. पुढच्या सात ते आठ वर्षांत या उपग्रहांमुळे तीनही दलांना फायदा होईल. स्पेस कमांडचा भाग असलेली डिफेन्स स्पेस एजन्सीकडे याची जबाबदारी असेल.
चीन-अमेरिकेकडेही ‘स्पेस फोर्स’
चीन या दिशेने अत्यंत वेगाने काम करीत आहे. कायनेटिक ए-सॅट शस्त्र स्थापित केले जात आहेत. म्हणजे या माध्यमातून अंतराळात क्षेपणास्त्रे कींवा उच्च शक्तीचे लेझर बिम सोडले जातील कींवा जामर्स अथवा सायबर वेपनचा वापर केला जाणल. चीनने या दलाला पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स नाव दिले आहे. युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स, असे अमेरिकेच्या दलाचे नाव आहे.