किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभुवनेश्वर, (६ जून) – तीन जखमी प्रवाशांच्या मृत्यूसह ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८ झाला असल्याची माहिती रेल्वेने दिली. राज्य सरकारची सुधारित आकडेवारी २७५ वर कायम आहे. २ जून रोजी झालेल्या या अपघातात २७८ जणांच्या मृत्युशिवाय ११०० लोक जखमी झाले असल्याची माहिती खुर्दा रेल्वे विभागाचे व्यवस्थापक रिंकेश राय यांनी दिली.
यापूर्वी अपघातातील बळीसंख्या २८८ दाखवण्यात आली होती. काही मृतदेहांची दोन वेळा मोजणी करण्यात आल्याचे कारण देत राज्य सरकारने मृतांचा सुधारित आकडा २७५ दाखवला. बंगालमधील ६१ जण या अपघातात मृत्युमुखी पडले तर, १८२ जण बेपत्ता असल्याचा दावा करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या संख्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. या अपघातात ११,०० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी २०० पेक्षा कमी प्रवाशांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती राय यांनी दिली. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी रेल्वेने ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत कर्मचारी तैनात केले आहेत.
१०० पेक्षा जास्त मृतदेहांची ओळख पटली नाही
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १०० पेक्षा जास्त मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे भुवनेश्वर एम्सने त्यांचे डीएनए नमुने घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत १० नमुने घेण्यात आले आहेत. हे मृतदेह आता पाच कंटेनरमध्ये हलवण्यात आले आहेत, जिथे ते अधिक काळासाठी जतन केले जाऊ शकतात, असे अधिकार्याने सांगितले.