किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलविल्लुपुरम, (८ जून) – तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील मेलपाडी येथे असलेले द्रौपदी अम्मन मंदिर बुधवारी प्रशासनाने सील केले आहे.मंदिरात दलितांच्या प्रवेशाबाबत वाद निर्माण झाला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने अधिकार्यांनी ही कारवाई केली आहे. मंदिर प्रवेशाबाबत प्रबळ जाती आणि दलित यांच्यात वाद आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश बंदी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी दलित व प्रबळ जातीच्या लोकांशी चर्चा करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोंडी सुटली नाही. मंदिराचे व्यवस्थापन हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडॉवमेंट विभागाद्वारे केले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये दलित समाजातील एक व्यक्ती मंदिरात घुसली होती. त्यास प्रबळ जातीच्या लोकांनी विरोध केला. यानंतर त्यांनी दलितांना मंदिरात जाण्यापासून रोखले. तेव्हापासून दलित समाज आणि प्रबळ जाती समाज यांच्यात वाद सुरू आहे. याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अधिकार्यांनी मंदिराला सील ठोकले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, विल्लुपुरमचे खासदार डी रविकुमार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सी पलानी यांना निवेदन सादर करून कोणत्याही जातीय भेदभावाशिवाय सर्व भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याची विनंती केली.