किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– गुजरात हायकोर्टात एसआयटीचा अहवाल सादर,
अहमदाबाद, (१० ऑक्टोबर) – गुजरातमधील मोरबी येथे गेल्या वर्षी झालेली पूल कोसळण्याची घटना ओरेवा कंपनीच्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे घडली, असा अहवाल अपघाताची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात सादर केला. एसआयटीने म्हटले आहे की, प्राथमिकदृष्ट्या ओरेवा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि दोन संचालकांसह संपूर्ण व्यवस्थापन यासाठी जबाबदार असल्याचे दिसते.
मोरबीतील मच्छू नदीवरील ब्रिटिशकालीन पूल गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता, त्यात १३५ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ५६ जण जखमी झाले होते. एसआयटीने सांगितले की, मोरबी नगरपालिकेने पुलाच्या दुरुस्तीचे काम ओरेवा कंपनीला सोपविले होते. ओरेवा कंपनीने ते काम एका ‘अक्षम एजन्सी’ला सोपविले होते आणि तांत्रिक तज्ज्ञांशी सल्लामसलत न करता हे काम केले गेले. मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध पी. मायी यांच्या खंडपीठासमोर सादर केलेल्या अहवालात एसआयटीने म्हटले आहे की, पुलाच्या नूतनीकरणानंतरच्या कामातही अनेक डिझाईन्स सदोष असल्याचे आढळून आल्याने तो कोसळला. ही घटना शासकीय निकषांनुसार योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात प्रशासकीय स्तरावरील त्रुटींचा परिणाम आहे आणि पुलाचे परीक्षण न करताच तो सार्वजनिक करण्यात आला. खंडपीठ या शोकांतिकेची स्वत:हून दखल घेत जनहित याचिकांवर सुनावणी करीत आहे.