किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– ३,४३२ घरांचे नुकसान,
– ५,३२७ लोकांना वाचवले,
गंगटोक, (०९ ऑक्टोबर) – सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरात मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे, असे राज्यातील अधिकार्यांनी सोमवारी सांगितले. भारतीय हवाई दलाने सिक्कीममध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे, अडकलेल्या पर्यटकांच्या पहिल्या तुकडीला लाचेन ते उत्तर सिक्कीममधील मंगन येथे हलविण्यात आले आहे. सात मुलांसह ७७ पर्यटकांना लाचुंग येथून पॉकयोंग विमानतळावर विमानाने नेण्यात आले.
मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी मुख्य सचिव व्ही. बी. पाठक, गंगटोक येथे पोहोचलेले लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि सशस्त्र दलांसह समन्वित मदत आणि बचावकार्यासाठी इतर अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली. मुख्य सचिव पाठक यांनी सोमवारी आंतर-मंत्रालयी केंद्रीय पथकाच्या सदस्यांसह आणखी एक बैठक घेतली आणि त्यांना नुकसानीची माहिती दिली. सिक्कीममध्ये नोंदवलेल्या ३४ मृत्यूंपैकी पॉकयोंग जिल्ह्यात सर्वाधिक २२ मृत्यू झाले आहेत, ज्यात १० लष्करी जवानांचा समावेश आहे तर, गंगटोकमध्ये सहा, मंगनमध्ये चार आणि नामचीमध्ये दोन मृत्यू आहे.
मंगन जिल्ह्यातील लोनाक सरोवरावर ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आल्याने सहा दिवसांनी एकूण १०५ लोक बेपत्ता झाले आहेत, हिमालय राज्यातील चार जिल्ह्यांतील नदीपात्रातील अनेक शहरांना पूर आला आहे. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निवेदनानुसार बेपत्ता लोकांपैकी पॉकयोंगमधील ६३, गंगटोकमधील २०, मंगन १६ आणि सहा नामची येथील आहेत. कच्च्या आणि पक्क्या ३,४३२ घरांचे नुकसान झाले आहे. एकूण ५,३२७ लोकांना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. राज्यातील रस्ते दळणवळणावर परिणाम करणारे एकूण १४ पूल एकतर वाहून गेले आहेत किंवा पाण्याखाली गेले आहेत.
त्या म्हणाल्या की, कोविड-१९ साथीच्या आजाराने खरे तर कृषी व अन्न प्रणाली आणि समाजातील संरचनात्मक असमानता यांच्यातील मजबूत संबंध प्रकट केला आहे. महिला रोपे लावतात, वाढवतात, कापणी करतात, प्रक्रिया करतात आणि बाजारात विकतात. शेतातून ताटात अन्न आणण्यात त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, परंतु तरीही जगभरातील भेदभावपूर्ण सामाजिक नियमांद्वारे त्यांना मागे ठेवण्यात येते आणि त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाते.
कृषी क्षेत्रातील लैंगिक समस्यांवरील जागतिक परिषदेला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतात बदल दिसून येत आहेत. कारण, कायदेमंडळ आणि सरकारी हस्तक्षेपांद्वारे महिला अधिक सक्षम होत आहेत. या क्षेत्रात महिला यशस्वी उद्योजक बनल्याच्या अनेक कथा आहेत. आधुनिक महिला असहाय नसून, सक्षम आहेत. कृषी-अन्न व्यवस्था अधिक न्याय्य बनवण्यासाठी राष्ट्रपतींनी केवळ महिलांचा विकास नव्हे, तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, विडंबना अशी आहे की, आधुनिक युगात प्रवेश करत असताना, समतोल आणि लवचीक कृषी-अन्न प्रणाली तयार करण्यात आम्हाला अजूनही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=56254