|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.99° से.

कमाल तापमान : 30.02° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 48 %

वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

27.14°से. - 30.61°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » कपाटात सापडले १४२ कोटी रुपये!

कपाटात सापडले १४२ कोटी रुपये!

आयकर अधिकारीही चक्रावले,
हैदराबाद, ११ ऑक्टोबर –
आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीत आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्युटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना एका आलमारीत तब्बल १४२ कोटी रुपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने सहा राज्यातील जवळपास ५० ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.
आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तके आणि रोख रक्कम सापडली. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. इतर अनेक कायदेशीर समस्या देखील ओळखण्यात आल्या आहेत. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या कमी किमतीत खरेदी केलेल्या जमिनीचा समावेश आहे. तपासादरम्यान अनेक बँक लॉकर्स सापडले आहेत, त्यापैकी १६ लॉकर्स चालवले जात आहेत.
५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर ६ ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
घरात किती सोने साठवू शकता?
घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने सोने खरेदी केले असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर घरात कितीही सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीच्या माहितीनुसार, तुम्ही घरी सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकता. मात्र, आयकर विभागाकडून घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची तपासणी होऊ शकते. तुमच्या घरात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने असतील, तर आयकर विवरणात ते नमूद करावे लागते. आयकर विभागाने याबाबत आणखी काही नियम घालून दिले आहेत.

Posted by : | on : 11 Oct 2021
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g