किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.78° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.78° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल-वोक्कालिगा, लिंगायत समुदायाला लाभ,
बंगळुरू, (२६ मार्च) – कर्नाटक सरकारने धार्मिक अल्पसंख्यकांसाठी चार टक्के आरक्षण संपुष्टात आणण्याची आणि ते राज्यातील प्रमुख दोन समुदायांच्या सध्याच्या आरक्षणात जोडण्याची घोषणा केली आहे. प्राप्त माहितीनुसार, कर्नाटकात अल्पसंख्यकांना चार टक्के आरक्षण असून, ते आता वोक्कालिगा आणि लिंगायत समुदायाच्या सध्याच्या आरक्षणात जोडण्यात येणार आहे. या दोन्ही समुदायासाठी मागील वर्षी बेळगाव विधानसभा अधिवेशन काळात २ सी आणि २ डीसंबंधित दोन नव्या आरक्षण श्रेणी बनविण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीअगोदरच कर्नाटक कॅबिनेटने धार्मिक अल्पसंख्यकांना ईडब्ल्यूएस श्रेणीअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे मुस्लिमांना १, २ आणि २ ई अशा तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. अत्यंत मागास धार्मिक अल्पसंख्यक, जे पिंजरा, नदाफ, दारोजी, छप्परबंद या मुस्लिमांच्या उप जाती असून, श्रेणी १ मध्ये सूचिबद्ध आहेत, ते त्याच आरक्षण सूचीमध्ये असतील. शुक‘वारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, धार्मिक अल्पसंख्यकांचा कोटा समाप्त करण्यात येणार असून, कोणत्याही बदलाशिवाय ईडब्ल्यूएस श्रेणीअंतर्गत आणण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. चार टक्के आरक्षण २ सी आणि २ डी यांच्यात विभागण्यात येईल. वोक्कालिगा आणि इतरांचे चार टक्के आरक्षण वाढून सहा टक्के होईल. तर, वीरशैव पंचमसाली आणि अन्य (लिंगायत), ज्यांना पाच टक्के आरक्षण मिळत होते, त्यांना आता सात टक्के आरक्षण मिळू शकेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.