किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलचिक्कबल्लापूर, (२६ मार्च) – वैद्यकीय शिक्षणातील भाषेच्या आव्हानाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजकीय स्वार्थासाठी आणि व्होटबँकेच्या राजकारणासाठी काही पक्षांनी भाषांशी खेळ केला. ते म्हणाले की आमच्या सरकारने कन्नडसह सर्व भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासाचा पर्याय दिला आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी भाजप सरकार सर्वांच्या सहभागावर भर देत आहे. भारत ’सर्वांच्या प्रयत्नाने’ विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधानांनी आज कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधानांनी वैद्यकीय शिक्षणातील भाषिक आव्हानाचा उल्लेख करत यापूर्वी वैद्यकीय शिक्षणात स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी अपुरे प्रयत्न केले गेले होते, अशी व्यथा मांडली. त्यामुळे गावातील व मागास समाजातून येणार्या तरुणांना डॉक्टर होणे अवघड झाल्याचे ते म्हणाले. काही पक्षांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि व्होट बँकेच्या राजकारणासाठी भाषांशी खेळ केला, असे पंतप्रधान म्हणाले. पण भाषेला खर्या अर्थाने बळकट करण्यासाठी जेवढे काम व्हायला हवे होते तेवढे झाले नाही. कन्नड ही समृद्ध भाषा आहे. याआधीच्या सरकारांनी कन्नडमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. खेड्यातील गरीब आणि दलित मागासलेल्या कुटुंबातील मुले-मुलीही डॉक्टर आणि इंजिनिअर व्हावीत, अशी या राजकीय पक्षांची इच्छा नव्हती. पंतप्रधान म्हणाले की, गरिबांच्या हितासाठी काम करणार्या आमच्या सरकारने कन्नडसह सर्व भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासाचा पर्याय दिला आहे.
पुढे बोलताना प्रधानमंत्री म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे. अनेकवेळा लोक विचारतात की भारताचा विकास कसा होणार? एवढी आव्हाने आहेत, एवढी कामे आहेत, ती इतक्या कमी वेळात कशी पूर्ण होणार? याचे उत्तर आहे ’सर्वांचे प्रयत्न’. प्रत्येक देशवासीयांच्या संयुक्त प्रयत्नाने हे शक्य होणार आहे. त्यामुळे भाजप सरकार सातत्याने सर्वांच्या सहभागावर भर देत आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात सामाजिक आणि धार्मिक संघटनांचा मोठा वाटा आहे. कर्नाटकात संत, आश्रम आणि मठांची मोठी परंपरा आहे. या सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी गरीब, मागास, आदिवासी आणि समाजातील इतर घटकांना श्रद्धा आणि अध्यात्मासोबतच सक्षम केले आहे. तुमच्या संस्थेने केलेले काम ’सबका प्रयास’ या भावनेला बळ देते, असे पंतप्रधान म्हणाले.
२०१४ पासून भारतात आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भारतातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, भारतातील आरोग्य सेवांबाबत गेल्या ९ वर्षांत अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत कार्यक्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशात वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की २०१४ मध्ये देशात ३८० पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती, आज ही संख्या ६५० पेक्षा जास्त झाली आहे. एकेकाळी विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या देशातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये ४० वैद्यकीय महाविद्यालये विकसित करण्यात आली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. गेल्या नऊ वर्षांत मेडिकलच्या जागांची संख्या दुपटीने वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशात जितके डॉक्टर झाले, तितकेच पुढच्या १० वर्षांत बनणार आहेत. कर्नाटकात आज ७० वैद्यकीय महाविद्यालये आहेत. चिकबल्लापूरची भूमी ही सर विश्वेश्वरयांसाठी नवीन शोध आणि नवीन अभियांत्रिकी प्रकल्प शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी विकसित करण्यासाठी प्रेरणास्थान आहे. सत्य साई ग्राम हे सेवेचे अप्रतिम मॉडेल असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्य उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या मिशनचे त्यांनी कौतुक केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनामुळे या अभियानाला आणखी बळ मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.