किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलरांची, (८ फेब्रुवारी ) – मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या आमदारांकडून जप्त करण्यात आलेल्या ४९ लाख रुपयांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने काँग्रेसचे आमदार राजेश कच्छप यांची जवळपास दहा तास चौकशी केली. राजेश कच्छप मंगळवारी दुपारी ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. त्यांची जवळपास दहा तास चौकशी करण्यात आली. झारखंड सरकार पाडण्याचे षडयंत्र रचण्याचे केलेले आरोप खोटे आणि बनावट असल्याचे त्यांनी नंतर ठामपणे सांगितले.
मी माझे मुद्दे ईडीसमोर ठेवले. तपास यंत्रणेने मला बेकायदेशीर सावकारीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. ईडी कार्यालयातील चौकशी कोणत्याही दबावाशिवाय सौहार्दपूर्ण वातावरणात करण्यात आली, असे कच्छप यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांना सांगितले.
तपास यंत्रणेला आपण पूर्ण सहकार्य करू, असे कच्छप यांनी सांगितले. पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी कच्छपने १६ जानेवारी रोजी केली होती. कच्छप आणि इतर दोन निलंबित काँग्रेस आमदार इरफान अन्सारी आणि नमन बिक्सल यांना गेल्या वर्षी ३० जुलै रोजी पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील पंचला येथे राष्ट्रीय महामार्ग १६ वर त्यांचे वाहन अडवल्यानंतर अटक करण्यात आली होती आणि कारमध्ये जवळपास ४९ लाख रुपये रोख सापडले होते.