किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलइंदूर, (८ फेब्रुवारी ) – इंदूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या योजनेला रेल्वे मंत्रालयाने प्रदीर्घ प्रयत्नानंतर अंतिम रूप दिले आहे. संपूर्ण योजनेवर १००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ३४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर इंदूर स्थानकाला नवे आधुनिक रूप देण्यासाठी रेल्वेने कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील मुख्य स्थानकाची रचना राजवाड्यापासून प्रेरित असेल. त्याचे नियोजन पुढील ५० वर्षांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले आहे.
यापूर्वी पार्क रोड स्थानकाचा समावेश योजनेत नव्हता, मात्र आता तो भागही समाविष्ट करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकासमोरील (सरवटे बस स्टँड रोडच्या पलीकडे) रेल्वेची जमीनही प्रकल्पात विकसित केली जाणार आहे. यापूर्वीही ४००-४५० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली होती. त्यातील उणिवा दूर करून नियोजनात बदल करून या प्रकल्पाला आता ठोस स्वरूप देण्यात आले आहे. खासदार शंकर लालवानी यांनी सांगितले की, इंदूर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी रेल्वे मंत्रालय १५ फेब्रुवारीला निविदा काढणार आहे. इच्छुक कंपन्या १५ एप्रिलपर्यंत त्यांच्या ऑफर सादर करू शकतील.
त्यानंतर १५ जूनपर्यंत निविदा काढून बेस्ट ऑफर देणार्या कंपनीकडे काम सोपवले जाणार आहे. प्रकल्पांतर्गत स्थानक परिसरासह क्रमांक एकच्या फलाटाच्या समोरील व दोन्ही बाजूंच्या जमिनीचा व्यावसायिक विकास करण्यात येणार आहे. इंदूर स्थानकात स्काय वॉकची सुविधा असेल, तसेच स्टेशनचा मेट्रो स्टेशनशी थेट संपर्क असेल. स्थानकाच्या पुनर्विकासासाठी तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनमध्ये भव्य प्रवेशद्वार, छतावरील प्लाझा, एक्झिक्युटिव्ह लाउंज, अतिरिक्त प्रवेशद्वार, नवीन प्लॅटफॉर्म कव्हर शेड, स्थानक परिसरात ड्रेनेज व्यवस्था तसेच वाय-फाय आणि इतर सुविधा असतील. पूर्वीच्या प्रकल्पात इंदूर स्थानकाचे प्लॅटफॉर्म दोन आणि तीन तोडून मार्गिका टाकण्याची योजना होती. आता तो काढण्यात आला आहे. आता या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आवश्यक सुधारणा करून अधिक चांगले केले जाईल, असे खासदार डॉ. गरज भासल्यास दुसर्या टप्प्यात पार्क रोड स्थानक परिसरात नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याची शक्यताही कायम ठेवण्यात आली आहे. ते म्हणाले की, इंदूर हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यामुळेच रेल्वे मंत्रालयालाही या जागेच्या विकासात कोणतीही कसर सोडायची नाही.