किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.05° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलजयपूर, (१३ डिसेंबर) – भारतीय जनता पक्षाचे (भाजप) भजनलाल शर्मा हे मंगळवारी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनले. वसुंधरा राजे आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांसारख्या बड्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद करून भजनलाल शर्मा यांनी राजस्थानमध्ये हे स्थान निर्माण केले आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक-२०२३ मध्ये भजनलाल शर्मा यांनी सांगानेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा पराभव केला होता. ते १,४५,००० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. त्यांनी पहिल्यांदाच सांगानेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आहे. यापूर्वीच्या आमदाराचे तिकीट रद्द करून भाजपने भजनलाल शर्मा यांना उमेदवार केले होते.
भजनलाल शर्मा
– भजनलाल शर्मा, ५६, हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भजनलाल शर्मा दीर्घकाळापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.
– भजनलाल शर्मा यांच्या वडिलांचे नाव किशन स्वरूम शर्मा आहे. भजनलाल शर्मा यांचे जयपूरमधील जवाहर सर्कल येथे निवासस्थान आहे.
– निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, भजनलाल शर्मा हे पदव्युत्तर (एमए) आहेत. त्यांनी राजस्थान विद्यापीठ, जयपूर (नॉन-कर्नल) येथून शिक्षण घेतले आहे.
– भजनलाल शर्मा सध्या सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भजनलाल शर्मा हे भाजपचे सरचिटणीसही आहेत.
– भजनलाल शर्मा यांनी चार वेळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे.
-२०२३ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते सांगानेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
– भजनलाल शर्मा यांची एकूण घोषित मालमत्ता १.५ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये ४३.६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि १ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
भजनलाल शर्मा यांचा राजकीय प्रवास
– राजस्थानमधील भाजपचे भजनलाल शर्मा यांचा राजकीय प्रवास महत्त्वाच्या कामगिरीने भरलेला आहे. ते चार वेळा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राहिले आहेत.
– भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले असून, त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्री बनवले आहे. स्वच्छ नेत्याची अशी त्यांची प्रतिमा आहे.
– भजनलाल शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी संबंधित आहेत. ते संघाच्या जवळचे मानले जातात.
– जयपूरचे माजी महापौर अशोक लाहोट यांचा पराभव करून भजनलाल शर्मा सांगानेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत.