किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 29.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.69° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल-योगी आदित्यनाथांची राहुल गांधींवर टीका,
लखनौ, (१२ मार्च) – विदेशी मंचांवर भारताचा दबदबा वाढत असताना, काही लोक विदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली. आज जे विदेशी भूमीत लोक भारतीय लोकशाहीवर टीका करीत आहेत, त्याच लोकांनी संधी मिळताच लोकशाहीचा गळा घोटण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात देशाला प्रसिद्धी मिळवून देत आहेत तर, काही लोक देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी गोरखपूर येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
हे लोक विदेशात असताना देशावर टीका करतात. देशात परतल्यावर केरळात असताना उत्तरप्रदेशवर आणि दिल्लीत असताना केरळवर टीका करतात. देशाची मजबूत लोकशाही कमकुवत करू इच्छिणार्या आणि ज्यांच्या कुटुंबाचा वारसा फोडा आणि राज्य करा, या राजकारणाचा आहे, अशा लोकांना ओळखले पाहिजे. त्यांचे वाईट मनसुबे यशस्वी होऊ देऊ नये, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ-नऊ वर्षांत देशाने केलेली कामगिरी नव्या भारताचे प्रतिनिधित्व करते. येणार्या काळात भारत हा जगाला रस्ता दाखवणारा देश असेल, असेही त्यांनी सांगितले.