किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलबंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वेचे लोकार्पण,
बंगळुरू, (१२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील १० पदरी बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वेचे लोकार्पण केले. ११९ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प ८,४८० कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आला आहे. कर्नाटकच्या जनतेने मला जे प्रेम दिले, त्याची व्याजासह परतफेड करण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. विरोधक माझी कबर खोदण्यात आणि मी जनतेची सेवा करण्यात व्यस्त आहे, असा धारदार हल्लाही मोदी यांनी विरोधकांवर चढविला.
या महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, आज कर्नाटकातील जनता मला आशीर्वाद देत आहे. कर्नाटकात डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून विकास होत आहे. डबल इंजिन सरकार कर्नाटकच्या जनतेच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करेल. या एक्सप्रेस-वेच्या लोकार्पणाचा आज देशातील तरुणांना अभिमान आहे. देशात असे आणखी एक्सप्रेस-वे तयार केले जातील. आता बंगळुरू ते म्हैसूर प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी झाला आहे.
माता-बहिणींचा आशीर्वाद माझे कवच
काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष माझी कबर खोदण्यात व्यस्त आहे आणि मी सर्वसामान्यांचे जीवन सुकर कसे होईल, यात व्यस्त आहे. माझी कबर खोदण्याचे स्वप्न पाहणार्यांना हे कळतच नाही की, या देशातील कोट्यवधी माता आणि बहिणींचा आशीर्वाद माझ्यासाठी सुरक्षा कवचाचे काम करीत असते, अशा घणाघाती शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.
काँग्रेसने देश, गरिबांना लुटले
देशात सर्वाधिक काळ सत्ता करणार्या काँगे‘सने गरिबी दूर करण्याच्या नावाखाली देशाला आणि गरिबांना फक्त लुटले आहे. गरिबांना गरीब ठेवून स्वत:चा फायदा करण्यात काँगे‘सचा हात कोणीही पकडू शकत नाही. केंद्रातून जो पैसा गरिबांच्या विकासासाठी निघायचा, त्यातील ८० ते ८५ टक्के पैसा काँगे‘स नेत्यांच्या घरात जायचा. या पक्षाला गरिबांच्या सुख-दु:खाशी काहीच संबंध नव्हता, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गाचे भूमिपूजन
बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाच्या बांधकामामुळे चार रेल्वे ओव्हरब्रीज, नऊ महत्त्वाचे पूल, ४० छोटे पूल आणि ८९ अंडरपास आणि ओव्हरपास विकसित होतील, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी म्हैसूर-कुशालनगर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजनही केले. ९२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प सुमारे ४,१३० कोटी रुपये खर्च करून विकसित केला जाणार आहे.
रोड शोमध्ये फुलांची उधळण
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी भव्य रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांची प्रचंड गर्दी होती. इमारतींवरून त्यांच्यावर फुलांची उळधण करण्यात आली. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोककलाकारांनीही पारंपरिक नृत्य सादर करून मोदी यांचे स्वागत केले.