किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– राज्य भाजपाचा जल्लोष,
तिरुवनंतपुरम्, (१५ एप्रिल) – देशात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस आता केरळ राज्यात धावणार आहे. केंद्र सरकारकडून राज्याला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटी राज्यात येतील, तेव्हा मोठी घोषणा करतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी म्हटले आहे. केरळला वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याचे वर्णन त्यांनी केंद्र आणि पंतप्रधानांकडून राज्यातील जनतेला विशू कायनेत्तम् असे केले. परंपरेनुसार, शनिवार १५ एप्रिल रोजी येणार्या विशू या कापणीच्या सणाच्या दिवशी कुटुंबातील वडील मंडळी घरातील सदस्यांना कायनेत्तम् म्हणून भेटवस्तू, विशेषत: पैसे देतात.
आज सकाळी चेन्नईहून पलक्कड येथे सेमी हायस्पीड ट्रेनच्या डब्याच्या अनपेक्षित आगमनाने स्थानिक लोकांमध्ये मोठा उत्साह दिसला. वंदे भारत एक्सप्रेस पाहण्यासाठी आणि भव्य स्वागत करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह लोकांनी स्थानकावर गर्दी केली होती. ट्रेनला रेल्वे अधिकार्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. वंदे भारतसार‘या एक्सप्रेसचे डबे माझ्या राज्यात येत आहेत. केरळमध्ये लवकरच वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करू शकेन, हे जाणून मला खूप आनंद झाला आहे, असे एका उत्साही वृद्धाने पलक्कड रेल्वेस्थानकावर सांगितले. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन् आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् म्हणाले की, नवीन वंदे भारत एक्सप्रेस ही पंतप्रधान मोदींची राज्यातील जनतेसाठी विशू कायनेत्तम् आहे.