किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभोपाळ, (१४ एप्रिल) – मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने वृद्ध यात्रेकरूंसाठी मोठी भेट देण्याची योजना आखली आहे. २१ मे पासून मध्य प्रदेश सरकार वृद्ध यात्रेकरूंना सरकारी खर्चाने विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नेणार आहे. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत यात्रा सुरू होत असून, त्याअंतर्गत आतापर्यंत वृद्ध भाविकांना रेल्वेने देशातील तीर्थक्षेत्रांमध्ये नेले जात होते, मात्र यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली की, आता यात्रेकरूंना विमानाने तीर्थक्षेत्री नेले जाईल. याबाबतचा आदेशही सरकारने गुरुवारी जारी केला आहे.
६५ वर्षांवरील वृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासन हे फॉर्म जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालयात उपलब्ध करून देणार असून ते त्याच ठिकाणी जमाही केले जातील. प्रत्येक जिल्ह्यातून ३२ पात्र यात्रेकरूंची निवड केली जाईल. तीर्थस्थळी जाणार्या विमानातील ३३ जागा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत अर्ज करणार्या प्रवाशांसाठी राखीव असतील, त्यात ३२ यात्रेकरू असतील आणि एक जागा जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या देखरेख अधिकार्यासाठी असेल. कोणत्याही जिल्ह्यात ३२ पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हाधिकार्यांच्या देखरेखीखाली संगणकीकृत पद्धतीने लॉटरी काढून पात्र यात्रेकरूंची निवड केली जाईल.
ज्या विमानतळावरून यात्रेकरूंना नेले जाईल, त्याच विमानतळावर यात्रेकरूंना परत आणले जाईल. यात्रेकरूंची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था आयआरसीटीसीच्या पॅकेज अंतर्गत असेल. विमानात यात्रेकरूंसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था असणार नाही. यात्रेकरू चेक-इन बॅगमध्ये १५ किलोपर्यंतचे सामान आणि हॅन्ड बॅगमध्ये ७ किलोपर्यंत सामान ठेवू शकतील. जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल तर विमानतळावर जादा सामानाचे शुल्क आकारले जाईल. नियोजित वेळेच्या ३ तास
आधी विमानतळावर पोहोचावे लागेल. नर्मदापुरम, नीमच, दमोह, रतलाम, शाजपूर, सागर, उज्जैन, खंडवा, बरवानी, बुरहानपूर, खरगोन, भोपाळ, इंदूर, अलीराजपूर, धार, राजगढ, रायसेन, सीहोर, झाबुआ, विदिशा, आगर-मालवा, बैतुल, देवास, मंदसौर जिल्ह्यातील वृद्ध यात्रेकरूंना पहिल्या टप्प्यात विमानाने तीर्थयात्रा करण्याची संधी मिळणार आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=52006