किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे परिपत्रक,
कोच्ची, (२३ मे) – केरळमधील मंदिरांचे संचलन करणार्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने १८ मे रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे आयोजन सर्व मंदिरांमध्ये केले जाणार नाही. त्याअंतर्गत असलेल्या मंदिरांमध्ये संघाचे कार्यक‘म होत असतील तर, त्या मंदिरांच्या पदाधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. २०१६ मध्ये त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने देखील मंदिर परिसरात संघाकडून शस्त्र प्रशिक्षणावर बंदी घालणारे परिपत्रक जारी केले होते. त्यानंतर ३० मार्च २०२१ रोजी पुन्हा परिपत्रक काढून आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच या परिपत्रकात धार्मिक विधी आणि उत्सव वगळता अन्य कोणत्याही कारणांसाठी मंदिर परिसराचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड केरळमधील सुमारे १२४८ मंदिरांची देखभाल आणि व्यवस्थापन करते.
काँग‘ेस नेते आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन् यांनीही त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या आदेशाचे समर्थन केले. २०२१ मध्येही असे परिपत्रक जारी करण्यात आले होते; परंतु संघाने त्याचे उल्लंघन केले. मंदिर परिसर अशा कामांसाठी वापरू नये, ते अत्यंत पवित्र स्थान आहे. केरळमधील ९० टक्के हिंदू संघ परिवाराच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. मंदिरांमधील सर्व प्रकारच्या कवायती आणि इतर कि‘याकलाप थांबवावेत. मंदिरे ही भक्तांची मालमत्ता आहे, असेही सतीसन् म्हणाले.