किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशकोची, (३० ऑक्टोबर) – केरळच्या एर्नाकुलम् शहराजवळील ख्रिश्चन धार्मिक सभेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या तीन झाली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एर्नाकुलम् जिल्ह्यातील मलायत्तूर येथील लिबिना नामक १२ वर्षीय मुलीचा सोमवारी पहाटे कलामासेरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सकाळी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती ९५ टक्के जळाली होती. व्हेंटिलेटरवर असतानाही तिची प्रकृती सतत खालावत राहिली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील हा तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी रविवारी या सभेत सहभागी झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तीन दिवस चाललेल्या प्रार्थना सभेच्या शेवटच्या दिवशी ख्रिश्चन समुदायाचे अनुयायी, जेहोवाज विटनेसेस, कलामासेरी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या अनेक स्फोटांदरम्यान ५० हून अधिक लोक जखमी झाले, काही गंभीर आहेत. घटनेच्या काही तासांनंतर यहोवाच्या साक्षीदारांचा सदस्य असल्याचा दावा करणार्या एका व्यक्तीने राज्याच्या थि‘सूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यानेच अनेक स्फोट घडवल्याचे सांगितले.