किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– ‘सामाजिक कार्यकर्ता ते उद्योजक’ असा प्रवास केलेल्या तरुणाचा पुढाकार,
जम्मू, (३० ऑक्टोबर) – जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण महिलांचा एक गट पर्यावरणपूरक दिवाळी सुनिश्चित करण्यासाठी शेणाचे दिवे बनवण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहे. ‘सामाजिक कार्यकर्ता ते उद्योजक’ असा प्रवास केलेल्या एका तरुणाने यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला सक्षमीकरण आणि उत्सवादरम्यान प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे या दुहेरी उद्देशाने या तरुण उद्योजकाने हा उपक्रम सुरू केला आहे. रजत सालगोत्रा असे या युवकाचे नाव असून, त्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने समस्त इको-अल्टरनेटिव्हज प्रायव्हेट लिमिटेड ही स्टार्ट-अप कंपनी सुरू केली. गेल्या वर्षी जम्मूच्या बाजारात गायीच्या शेणापासून बनवलेले दिवे सादर करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले होते. यंदा दीपोत्सवासाठी २० हजारांपेक्षा जास्त शेणाचे दिवे उपलब्ध करून देण्याची त्यांची योजना आहे. यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मु‘य दिवस आहे.
आम्ही प्राचीन काळापासून पूजेसाठी गायीच्या शेणाचा वापर करीत आलो आहोत. गावातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि मूर्ती तसेच शेणाच्या दिव्यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तू बनवून पर्यावरणाचे रक्षण करणे हा आमचा उद्देश आहे. गेल्या वर्षी आम्ही आठ हजार नग विकले, असे दिशा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य असलेल्या सालगोत्रा यांनी येथे वृत्तसंस्थेला सांगितले. गाईच्या शेणापासून बनवलेले दिवे हे मातीच्या दिव्यांपेक्षा वेगळे असतात. ते पूर्णपणे जळून जातात आणि राख किंवा कीटकनाशक अथवा खत म्हणून वापरले जाऊ शकते. दिवे सूर्यप्रकाशात वाळवले जातात आणि ते तयार करण्यासाठी कोणतेही रसायन किंवा कृत्रिम रंग वापरले जात नाहीत, असे सालगोत्रा म्हणाले.
वस्तूच्या उत्पादनापासून ते विल्हेवाट लावण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक असून, गावातील महिलांना रोजगार मिळत आहे. आम्ही अगरबत्ती आणि गणेश चतुर्थी मूर्ती यासारखी विविध उत्पादने बनवत असल्यामुळे अधिकाधिक लोकांनी आमच्या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. रजन सालगोत्रा यांच्या उपक्रमात सहभागी महिलांपैकी एक लवली देवी म्हणाली की, हा उपक्रम गावातील महिलांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आम्ही बहुतेकजणी घरातील कामांनंतर रिकाम्याच बसत होतो. आता आम्ही काम करू शकतो आणि पैसेही कमवू शकतो.