किमान तापमान : 28.58° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
25.84°से. - 30.87°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल27.21°से. - 30.97°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. अलामंडा आणि कंटकपल्ले विभागा दरम्यान रुळावरून रेल्वेगाडी घसरण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. शोकाकुल कुटुंबियां प्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली.
प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून २ लाख रुपये आणि रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील संदेशात म्हटले आहे: पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आणि कांतकापल्ले विभागा दरम्यान रुळावरून रेल्वेगाडी घसरण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेतला.
अधिकारीवर्ग नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहेत. शोकाकुल कुटुंबांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी अलामंडा आणि कंटकपल्ले विभागादरम्यान रुळावरून रेल्वेगाडी घसरल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक मृताच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून २ लाख रुपयांचा मदत निधी देण्याची घोषणा केली आहे. जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.