किमान तापमान : 27.15° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 1.7 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.86°से. - 28.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलराहुल गांधी यांना मोठा धक्का,
नवी दिल्ली, ९ जून – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी असताना राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी आज बुधवारी भाजपात प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भाजपा मुख्यालयात रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि भाजपा माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र असलेले जितीन प्रसाद पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे प्रभारी होते.
२००४ मध्ये खासदार झालेले जितीन प्रसाद यांचा २००८ मध्ये पोलाद राज्यमंत्री म्हणून प्रथमच डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. २००९ मध्ये दुसर्यांदा लोकसभेवर निवडून आल्यानंतर प्रसाद यांच्याकडे मानव संसाधन विकास राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच जितीन प्रसादही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जात होते. शिंदे यांच्यानंतर जितीन प्रसाद यांनीही भाजपात प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पूर्ण विचाराने घेतला निर्णय
देशहितासाठी आज कोणी काम करीत असेल तर ते भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, असे जितीन प्रसाद यांनी सांगितले. पूर्ण विचाराने आणि समजून मी हा निर्णय घेतला आहे. मी कोणता पक्ष सोडत आहे, हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या पक्षात जात आहे, ते महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
आम्ही कुणालाच अडवणार नाही : खरगे
उत्तरप्रदेशातील प्रमुख ब्राह्मण चेहरा असलेल्या जितीनप्रसाद यांची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातच भाजपात प्रवेश करण्याची चर्चा होती.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे, आम्ही कोणालाही अडवणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.