किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा वेगळा मार्ग,
जयपूर, ९ जून – राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पुन्हा एकदा संकटात येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट गट आक्रमक झाला असून, जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करा अन्यथा स्वतंत्र मार्ग पत्करण्यासाठी आम्ही तयार असल्याचा इशारा पायलट गटाचे दिला आहे.
गेहलोत गटाचे काही आमदारही पायलट गटाच्या संपर्कात असल्याने, मुख्यमंत्री गेहलोत गंभीर संकटात सापडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
येत्या ११ जून रोजी सचिन पायलट यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने दरवर्षी दौसाच्या भंडाना येथे प्रार्थना सभा आणि पुष्पांजली कार्यक्रम आयोजित केला जातो. मागील वर्षी याच कार्यक्रमात बंडखोरीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली होती. यंदाच्या कार्यक्रमातही असे काही होणार का, याची शक्यता गेहलोत करीत आहेत.
पायलट गटाच्या बैठकी
मागील दोन दिवसांमध्ये डझनभर आमदारांच्या सचिन पायलट यांच्या घरी वेगवेगळ्या बैठका पार पडल्या. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका वढेरा यांची पुढील महिन्यात भेट घेण्याचा या गटाचा प्रयत्न आहे.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव भंवर जितेंद्रसिंह हेदेखील सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पक्ष नेतृत्वाने दिलेली आश्वासने पूर्ण करून पायलट गटाला संतुष्ट करावे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, राज्यात मुख्यमंत्री बदलण्याची किंवा सरकारला कोणताही धोका असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. भंवर जितेंद्रसिंह आसाममध्ये कॉंग्रेसचे प्रभारी आहेत तसेच मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्रीही होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सचिन पायलट यांच्या नेतृत्वात राजस्थानच्या अनेक कॉंग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले होते. त्यावेळी दोन्ही गटांचे नेते अनेक दिवस हॉटेलमध्ये मुक्कामी होते. परंतु, पक्ष नेतृत्व पायलट यांचे मन वळवण्यात यशस्वी ठरले होते.