|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » राजस्थान, राज्य » गहलोतांकडून आचारसंहितेचा भंग; प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा वापर

गहलोतांकडून आचारसंहितेचा भंग; प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा वापर

जयपूर, (१४ ऑक्टोबर) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्या पक्षाच्या राजकीय बैठकांसाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा वापर केला आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप राजस्थानातील भाजपाचे नेते अरुण चतुर्वेदी यांनी केला आहे. राजस्थानात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. गहलोत हे नुकतेच नवी दिल्ली येथे सोनिया गांधी यांना भेटायला गेले होते. यावेळी ते त्यांच्या सचिवाला सरकारी गाडीतून घेऊन गेले. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केला. त्याचप्रमाणे गहलोत हे अनेकवेळा राजकीय बैठकांसाठी प्रशासनातील कर्मचार्यांचा वापर करून घेतात, असा आरोपही चतुर्वेदी यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही मंत्र्याला त्याच्या कर्मचार्यांना राजकीय पक्षाची कामे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे आचारसंहिता लागू झाल्यानंतर करण्यात आलेल्या घोषणा आणि नेमणुका देखील आचारसंहितेचा उघडपणे भंग आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणी भाजपा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले.
पाचशे कोटींचा काळा पैसा
जयपूरमधील खाजगी लॉकरमध्ये सुमारे ५०० कोटींचा काळा पैसा आणि ५० किलो सोने लपविले असल्याचा आरोप भाजपाचे राज्यसभा खासदार किरोडी लाल मीना यांनी जयपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत केला. हे लॉकर कोणाचे आहे, याची नावे मात्र त्यांनी जाहीर केलेली नाही. त्यांची नावे जाहीर केल्यास राजकीय दबाव येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

Posted by : | on : 14 Oct 2023
Filed under : राजस्थान, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g