किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलजुनागढ, (०३ फेब्रुवारी) – द्वेषभावना निर्माण करणारी गरळ ओकणारा मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी याला गुजरात पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मुंबईतून अटक केली, अशी माहिती अधिकार्यांनी सोमवारी दिली. गुजरातच्या जुनागढ शहरातील एका पोलिस ठाण्याजवळील मैदानात ३१ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात त्याने गरळ ओकली होती. त्याच्या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर अझहरी, स्थानिक आयोजक मोहम्मद युसुफ मालेक आणि अझिम हबिब ओडेदराच्या विरोधात भादंवितील कलम १५३ बी (दोन समुदायांमध्ये वैर निर्माण करणे) आणि कलम ५०५(२) (सार्वजनिक गैरव्यवहारास अनुकूल विधाने करणे) या कलमाच्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
मालेक आणि हबिबला शनिवारी अटक करण्यात आली. पोलिस अझहरीच्या शोधात होते. गुजरात पोलिसांनी त्याला मुंबईत शोधले आणि रविवारी अटक केली. मुंबई न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर त्याला जुनागढला आणले गेले, अशी माहिती जुनागढ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जे. जे. पटेल यांनी दिली. त्याला लवकरच न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अझहरी धर्माबद्दल बोलतील आणि व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करतील, असे सांगून आयोजकांनी या कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती. मात्र, त्याने या कार्यक्रमात द्वेष निर्माण करणारे भाषण केले.
मुंबईत सौम्य बळाचा वापर
गुजरात पोलिसांनी अझहरीला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याचे शेकडो समर्थक घाटकोपर पोलिस ठाण्याच्या बाहेर गोळा झाले. या परिसरातील वाहतूक रोखत त्याची तातडीने सुटका करण्याची मागणी त्यांनी केली. शेवटी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करीत समर्थकांना पांगवावे लागले.