किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो: हेमंत सोरेन,
रांची, (०३ फेब्रुवारी) – झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. त्यांच्या सरकारने सोमवारी ४७ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत चाचणी जिंकली. हेमंत सोरेन यांना जमीन भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.
या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार, सोमवारी ४७ आमदारांच्या पाठिंब्याने चंपई सोरेन यांनी विधानसभेत बहुमताची चाचणी पास केली. यावेळी विरोधी गटात २९ आमदार होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष रवींद्र नाथ महतो यांच्यासमोर आवाजी मतदाने विश्वास मत प्रस्ताव विधानसभा सभागृहात मंजूर झाला.
हेमंत सोरेन सहभागी
जमीन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. परंतु, चंपई सोरेन यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी ते उपस्थित होते. विशेष न्यायालयाने त्यांना राज्य विधानसभेतील बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती.
हेमंत सोरेन यांचे आव्हान
आपल्या विरोधातील आरोप सिद्ध करूनच दाखवा, असे आव्हान जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपाला दिले. हे आरोप सिद्ध झाल्यास, आपण राजकारणच काय, झारखंडही सोडू, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने रचलेल्या कटात राज भवनाचाही वापर करण्यात आला, असा आरोप हेमंत सोरेन यांनी विधानसभेत आज पार पडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना केला.
बेकायदेशीर सावकारी प्रकरणात ईडीने मागील आठवड्यात हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे अध्यक्ष चंपई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करा, असे मी भाजपाला आव्हान देतो. हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेल, असे सोरेन म्हणाले. ३१ जानेवारी हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. राज भवनाच्या इशार्यावर एका मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली. झारखंडमध्ये एका आदिवासी मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा, असे भाजपाला वाटत नाही. त्यांची सत्ता असतानाही या पक्षाने असे होऊ दिले नव्हते, असा आरोप सोरेन यांनी केला.