किमान तापमान : 29.22° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 43 %
वायू वेग : 6.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.71°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश– जीतनराम मांझी यांची खंत,
पाटणा, (०३ फेब्रुवारी) – बिहारमधील राजकारण पुन्हा एकददा तापू लागले आहे. नितीश सरकारला समर्थन देणा्या एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अद्याप नितीश सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध व्हायचे आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान आवाम मोर्चा अर्थात एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला आहे. मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांनी बिहार कॅबिनेटमध्ये शपथ घेतली असून, त्यांना एससी- एसटी मंत्रालय देण्यात आले आहे. मात्र, याच निर्णयावरून जीतनराम मांझी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘आम्हाला वारंवार एकच मंत्रालय दिले जाते. एखादे मोठे मंत्रालय किंवा विभाग आम्हाला का दिला जात नाही? मी मंत्री असताना मला देखील हेच मंत्रालय देण्यात आले होते. आता माझ्या मुलालासुद्धा हेच मंत्रालय देण्यात आले आहे,’अशा शब्दांत मांझी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही सार्वजनिक बांधकाम किंवा रस्ते निर्मिती विभाग सांभाळू शकत नाही का? मला याविषयी फारच खंत वाटते आहे,’ अशी स्पष्टोक्ती मांझी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली. ते वझीरगंजमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करीत होते.
मांझी यांच्या या वक्तव्यानंतर, संतोष सुमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना ऊत आला होता. शेवटी सुमन यांनी स्वत:च समाजमाध्यमांवर संदेश देत आपली भूमिका स्पष्ट केली. राजकारणाच्या क्षेत्रात मांझी यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापुढे ठेवल्याचे वृत्त आहे. संतोष सुमन यांना नवीन मंत्रालय किंवा मंत्रीमंडळात आवाम मोर्चाला आणखी एक मंत्रीपद देण्याच्या मागणीवर मांझी ठाम आहेत. दरम्यान, बिहारची फ्लोअर टेस्ट होईपर्यंत राजकारण असेच तापत राहणार आहे आणि सामान्यजनांचे लक्ष वेधून घेणार आहे.