Posted by वृत्तभारती
Thursday, February 19th, 2015
सूरत, [१८ फेब्रुवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नवी दिल्ली येथील भेटीदरम्यान परिधान केलेला बंद गळ्याचा आणि त्यांचे नाव असलेला वादग्रस्त सूटवर सूरतस्थित कापड व्यावसायिकाने तब्बल १.२१ कोटींची बोली लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंसह इतर काही वस्तूंच्या तीन दिवसीय लिलावाला बुधवारपासून येथे सुरुवात झाली. यादरम्यान राजेश जुनेजा नावाच्या कपडा व्यावसायिकाने १.२१ कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली. तत्पूर्वी, विराल...
19 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 19th, 2015
=आपले ‘अच्छे दिन’ आल्याचा दावा= अहमदाबाद, [१८ फेब्रुवारी] – इशरत जहॉं आणि सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांना जामीन मंजूर झाल्यानंतर बुधवारी त्यांची साबरमती मध्यवर्ती तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. सुमारे साडेसात वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर वंजारा बाहेर आले आहेत. मला स्वत:ला आणि गुजरातच्या पोलिस अधिकार्यांसाठी खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी प्रतिक्रिया वंजारा यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बोलताना व्यक्त केली. राज्यातील पोलिस अधिकार्यांना...
19 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 13th, 2015
बडोदा, [१२ जानेवारी] – येत्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी भारत देश सज्ज झाला असतानाच, अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकरसंक्रातीनिमित्त आकाशात झेपावण्यासाठी मोदी आणि ओबामा पतंगही सज्ज झाले आहेत. प्रामुख्याने गुजरातच्या बडोदा, सूरत, भरूच, राजकोट, अहमदाबाद आणि राज्यातील अन्य शहरांमधील बाजारपेठा मोदी आणि ओबामांचे छायाचित्र असलेल्या पतंगांनीच सजल्या आहेत. या दोन्ही पतंगांना गुजरातमध्ये प्रचंड मागणी होत आहे, अशी माहिती बडोदा पतंग विक्री आणि मालकी...
13 Jan 2015 / No Comment / Read More »