किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– नियंत्रण कक्ष उघडण्याचा निर्णय,
भुवनेश्वर, (२७ एप्रिल) – हवामान खात्याने या पंधरवड्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची कोणतीही शक्यता वर्तवली नसली तरी मागील तीन वर्षांपासून उन्हाळी चक्रीवादळाचा सामना करणार्या ओडिशा राज्याने या हंगामात कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी तयारी सुरू केली आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने १ मे पासून सर्व जिल्ह्यांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी ओडिशा राज्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अनेक सरकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस महासंचालक, अग्निशमन सेवा महासंचालक, विशेष मदत आयुक्त आणि भुवनेश्वर हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जेना यांनी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास, गृहनिर्माण आणि शहरी विकास, आरोग्य, गृह आणि पंचायती राज आणि पेयजल यासार‘या विभागांना उन्हाळी चक्रीवादळ राज्यात धडकल्यास तयार राहण्यास सांगितले. पारादीप आणि गोपाळपूर येथे बसविण्यात आलेल्या डॉप्लर रडारच्या माहितीवर चर्चा करण्यात आली. हे दोन रडार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कोणत्याही उन्हाळी चक्रीवादळाचा मागोवा घेण्यास मदत करतील. २०१९ मध्ये ओडिशाला फनी चक्रीवादळाचा सामना करावा लागला, तर अम्फान आणि यास चक्रीवादळांनी अनुक्रमे २०२० आणि २०२१ मध्ये राज्यात धुमाकूळ घातला होता. मात्र गेल्या वर्षी असे चक्रीवादळ आले नव्हते.
दूरसंचार ऑपरेटर्सनी चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशांना तोंड देण्यासाठी अनेक उपाय योजले असताना, राज्य सरकारने त्यांना अखंडित सेवा सुनिश्चित करण्यास आणि चक्रीवादळाबाबत लोकांना सतर्क राहण्यास सांगितले. हवामान खात्याचे अधिकारी आणि वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ यू. एस. डॅश यांनी सांगितले की, रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनेलद्वारे हवामान बुलेटिन आणि चक्रीवादळ सूचना प्रसारित करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे आता उन्हाळी चक्रीवादळ होण्याची शक्यता नाही, अशी माहिती राज्य सरकारला देण्यात आल्याचे ते म्हणाले.