किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-पोलिसांना श्रीमुखात भडकावल्याचा आरोप,
हैदराबाद, (२५ एप्रिल) – वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान एका महिला पोलिस कर्मचार्याला धक्काबुक्की करीत कानाखाली मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शर्मिला यांना विशेष तपास पथकाच्या कार्यालयात जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. भरती परीक्षेच्या कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. ही परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाने आयोजित केली होती. शर्मिला यांची कार एसआयटीच्या कार्यालयाजवळ येताच पोलिस कर्मचारी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. कार थांबल्यानंतर शर्मिला बाहेर जात पोलिस कर्मचार्याला धक्काबुक्की करीत असल्याचा आणि कानाखाली मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इतर पोलिस कर्मचारी शर्मिला यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना, त्या पोलिस कर्मचार्यांसोबत गैरवर्तन करताना स्पष्ट दिसत आहे.