किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 30.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 5.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.34° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– फरार शाईस्ता ‘सीए’च्या संपर्कात,
लखनौ, (२५ एप्रिल) – माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येनंतर अतिकची पत्नी शाईस्ता परवीनचे लक्ष नवर्याच्या आर्थिक साम्राज्यावर आहे. शाईस्ता अतिकचे आर्थिक साम्राज्य स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तरप्रदेश एसटीएफला मिळालेल्या माहितीनुसार, शाईस्ता अतिकच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शाईस्ता फरार आरोपी आहे. पोलिसांना चकवा देत ती अतिकशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंटच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
शाईस्ता परवीन उमेश पाल हत्याकांडासह अतिकच्या अनेक काळ्या धंद्यांमध्ये सहभागी होती. पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून शाईस्ताला शोधत आहेत. पोलिसांनी तिच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. ती फरार असली तरी, सध्या चार्टर्ड अकाऊंटंटच्या मदतीने अतिकची संपत्ती स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिस सध्या या सीएच्या मागावर आहेत, जेणेकरून ते शाईस्तापर्यंत पोहोचू शकतील. हा सीए शाईस्ताची मदत करीत असल्याचे सांगितले जात आहे.
शाईस्ताने या सीएकडे अतिकच्या काळ्या धनाचा लेखाजोखा मागितला आहे. खरंतर शाईस्ता ही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्याआधी ती पैशांचा बंदोबस्त करीत आहे; जेणेकरून आत्मसमर्पण केल्यानंतर जामीन आणि न्यायालयीन लढाईत ती त्या पैशांचा वापर करू शकेल.