किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपाटणा, (२५ एप्रिल) – बिहारमधील डॉन माजी खासदार आनंद मोहनला दलित अधिकार्याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, नितीश कुमार-तेजस्वी यादव सरकारने नियमांमध्ये बदल करून खास तरतुदीद्वारे आनंद मोहनची त्याच्या मुलाच्या लग्नासाठी सुटका केली. इतकेच नाही तर, आनंद मोहनच्या मुलाच्या लग्नाला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आपल्या लव्याजम्यासह हजरही राहिले.
गोपालगंजचे जिल्हा दंडाधिकारी दलित आयएएस अधिकारी जी. कृष्णय्या यांच्या हत्येबद्दल त्यावेळेचा अपक्ष खासदार आनंद मोहनला न्यायालयाने दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो शिक्षा भोगतच होता, पण नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारच्या तुरुंग अधिनियमात परस्पर बदल करून आनंद मोहनची सुटका केली. त्यासाठी त्याच्या मुलाच्या लग्नाचे निमित्त दाखविले. प्रत्यक्ष कामकाजावर असलेल्या सरकारी अधिकारी-कर्मचार्यांची हत्या यासंदर्भातले कलम आनंद मोहनच्या शिक्षेतून वगळले. आनंद मोहनची तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी एखाद्या हिरोसारखे त्याचे स्वागत केले. त्याच्या मुलाचा लग्नसमारंभदेखील थाटात झाला. स्वतः नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या लग्नाला सरकारी लव्याजम्यासह हजर राहिले.
या स्वागत समारंभाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून, नितीश कुमार यांच्या सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेवर अनेक जण प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. गँगस्टर माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांच्या हत्येनंतर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी लिबरल जमात आनंद मोहनच्या सुटकेनंतर मात्र मूग गिळून गप्प आहे, यावरही अनेकांनी शरसंधान साधले आहे.